Wednesday , March 4 2026
Breaking News

हरियाणात गणपती विसर्जनादरम्यान सात जणांचा बुडून मृत्यू, चार जण जखमी

Spread the love

 

देशभरात आज गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात आहे. विसर्जनादरम्यान हरियाणामध्ये मोठी दूर्घटना घडल्याचे समोर आले आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करताना सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली आहे. सोनिपतमध्ये तिघांचा तर महेंद्रगडमध्ये चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
सोनिपतच्या मीमरघाटावर शुक्रवारी एका भाविकाकडून गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते. यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत या व्यक्तीसह त्याचा मुलगा आणि पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या तिघांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. तर दुसरी घटना महेंद्रगडमधील कानिना-रेवारी रस्त्यावर घडली आहे. या परिसरातील एका कालव्यावर नऊ जण गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी गेले होते. यादरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात हे सर्व जण वाहून गेले. अथक प्रयत्नानंतर एनडीआरएफच्या बचाव पथकाने आठ जणांना या कालव्यातून बाहेर काढले. तोपर्यंत यातील चार जणांचा मृत्यू झाला होता. अन्य चार जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *