Thursday , December 11 2025
Breaking News

राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वाद, भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी

Spread the love

 

नवी दिल्ली : राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. बेरोजगारी, महागाई, गरिबी या मुद्द्यांवरून काँग्रेस सातत्याने भाजपला घेरते आहे, तर या भेटीतून जनतेचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. तर भाजपही या यात्रेवर खास लक्ष ठेवून आहे. भारतीय जनता पक्षाने काल काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर निशाणा साधत एक ट्विट केले होते. ज्यात म्हटंलय..
41 हजाराचा टी-शर्ट- भाजप
भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. यासोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्या टी-शर्टची किंमत आणि ब्रँड लिहिलेला आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींनी 41 हजार रुपये किमतीचा टी-शर्ट घातला आहे. हा फोटो शेअर करत भाजपने लिहिले, ’भारत बघा’ असं म्हटलंय. तर काँग्रेसनेही यावर प्रत्युत्तर दिलंय.
काँग्रेसचे प्रत्युत्तर
भाजपच्या या ट्विटनंतर काँग्रेसने प्रत्युत्तर देत म्हटलं, केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप सध्या भारत जोडो यात्रेबाबत लोकांच्या प्रतिक्रियांमुळे घाबरला आहे. काँग्रेस म्हणाली, भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून ’अरे… तुम्ही घाबरलात का? बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली तर मोदीजींचा 10 लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा होईल.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *