नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा कंबर कसत असून आज पक्षाने विविध राज्यांतील ’सेनापतीं’ची नियुक्ती केली आहे. भाजपाने 15 राज्यांमध्ये आपले नवे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, जेपी नड्डा यांनी नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे आणि ही यादी तत्काळ लागू करण्यात आली आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री असलेले महाराष्ट्राचे प्रकाश जावडेकर, तसेच राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे व पंकजा मुंडे यांचा समावेश आहे.
जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळ प्रभारीपद सोपवले असून महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर बिहारची जबाबदारी आहे. याशिवाय, ओम माथूर हे छत्तीसगडचे, बिप्लब कुमार देब हे हरियाणाचे, लक्ष्मीकांत वाजपेयी हे झारखंडचे, राधामोहन अग्रवाल हे लक्षद्वीपचे, पी मुरलीधर राव हे मध्य प्रदेशचे, विजय पंजाब आणि विजय राव हे चंदीगडचे, तरुण चुघ हे तेलंगणाचे, अरुण सिंग हे राजस्थानचे, महेश शर्मा हे त्रिपुराचे, मंगल पांडे हे पश्चिम बंगालचे आणि संबित पात्रा हे ईशान्य भारताचे प्रभारी असणार आहेत.
काही राज्यांत सहप्रभारींचीही नियुक्ती
खासदार हरीश द्विवेदी बिहारमधून, आमदार नितीन नबीन छत्तीसगडमधून, खासदार डॉ. राधामोहन अग्रवाल केरळमधून, पंकजा मुंडे आणि डॉ. रमाशंकर कथेरिया मध्य प्रदेशमधून, नरिंदर सिंग रैना पंजाबमधून, अरविंद मेनन तेलंगणातून, विजया रहाटकर राजस्थानातून, अमित मालवीय आणि डॉ. आशा लाक्रा पश्चिम बंगालमधून तर ऋतुराज सिन्हा यांना ईशान्येकडील राज्यांतून सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta