Wednesday , March 4 2026
Breaking News

लिफ्ट तुटल्यामुळे सात मजुरांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

अहमदाबाद : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी इमारतीच्या नवव्या मजल्यावर बांधकाम सुरू होते. यावेळी कामगार लिफ्टमधून सामान वरच्या मजल्यावर नेते होते. मात्र लिफ्ट सातव्या मजल्यावर पोहोचताच अचानक तुटली, आणि खाली कोसळली, यावेळी लिफ्टमध्ये एकूण 8 मजूर होते. यातील सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत कामगारांना लिफ्टमधून बाहेर काढले.
अधिक वजनामुळे लिफ्ट कोसळल्याचा संशय
सर्व कामगार एकत्र लिफ्टमध्ये उभे होते. अधिक वजनामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. लिफ्ट तुटताच आठही मजूर एकत्र खाली पडले. या कामगारांच्या सुरक्षेसाठी जाळीही बसवण्यात आली होती, मात्र ती कमकुवत निघाली. जाळीसह कामगार खाली पडले. यातील काही मजूर ग्राउंड फ्लोअरवर, तर काही मजूर बेसमेंटमध्ये पडले. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *