Wednesday , March 4 2026
Breaking News

इंग्लंडमधील हिंदू मंदिराबाहेर 200 मुस्लिमांचे अल्लाहू अकबरचे नारे

Spread the love

 

लंडन : लंडनमधील लीसेस्टरमध्ये हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराच्या घटनेनंतर आता इंग्लंडमधील स्मेथविक शहरातील एका हिंदू मंदिरासमोर कथित मुस्लीम जमावाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मंदिराकडे जात असताना हा जमाव अल्लाहू अकबरचे नारे देतानाचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. हे आंदोलक स्मेथविक परिसरातील दुर्गा भवन हिंदू मंदिराकडे जात होते. येथील सुरक्षा यंत्रणांनी जमावाला थांबवत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न केला असता, यातील काही आंदोलकांनी भिंतीवर चढण्याचाही प्रयत्न केला.
‘बर्मिंगहॅम वर्ल्ड’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर इंग्लंडमधील लीसेस्टर शहरात हिंसक घटना घडल्या होत्या. येथे शहरातील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती, तसेच अज्ञात व्यक्तींनी मंदिराबाहेरिल भगवा ध्वज खाली खेचला होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील ‘अपना मुस्लीम’ नावाच्या अकाऊंटवर मंगळवारी (20 सप्टेंबर) दुर्गा भवन मंदिराबाहेर ‘शांततापूर्ण निषेध’ आंदोलन करण्यासाठी जमा होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *