नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अधिकार्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. याप्रकरणी ईडीने यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी केली होती.
नेते म्हणतात- नोटीस मिळालीच नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने काँग्रेस नेते सुदर्शन रेड्डी, शब्बीर अली आणि जे. गीता रेड्डी यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, तिन्ही नेत्यांनी नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे.
डीके शिवकुमार यांनी ईडीकडे मागितली मुदत
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत ईडीकडून त्यांची चौकशी केली जाईल, असे सांगितले होते. मी नॅशनल हेराल्ड कंपनीसोबत केलेल्या काही व्यवहारांबाबत मला चौकशी करण्यात आली होती, असे त्यांनी 19 सप्टेंबर रोजी सांगितले होते. शिवकुमार म्हणाले की, माझी मालमत्ता आणि दायित्वे तपशीलवार स्पष्ट करण्यासाठी मी एजन्सीकडे आणखी वेळ मागितला आहे.
ईडीने सोनियांना विचारले होते 100 हून अधिक प्रश्न
21 जुलै रोजी सोनिया गांधी पहिल्यांदा ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या, जिथे त्यांची 3 तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर 5 दिवसांनी ईडीने त्यांना 26 जुलै रोजी बोलावून 6 तास चौकशी केली. त्यानंतर 27 जुलै रोजी ईडीने सोनियांना चौकशीसाठी बोलावले, जिथे एजन्सीने त्यांची 3 तास चौकशी केली. एकूण 12 तासांच्या चौकशीत त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
राहुलच्या उत्तरांवर ईडी असमाधानी
राहुल गांधी यांच्या 5 दिवसांच्या चौकशीदरम्यान ईडीने अनेक प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ईडीचे अधिकारी त्यांच्या उत्तरांवर असमाधानी दिसले. चौकशीदरम्यान राहुल यांनी यंग इंडिया लिमिटेडला ना नफा ना तोटा कंपनी म्हटले. ईडीच्या अधिकार्यांनी या कंपनीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामांची माहिती देण्यास सांगितले होते.
Belgaum Varta Belgaum Varta