Tuesday , March 3 2026
Breaking News

आशा पारेख ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित

Spread the love

 

नवी दिल्ली : ’68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी, अशा शब्दांत आशा पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केला.

आशा पारेख म्हणाल्या,”राष्ट्रपतींच्या हस्ते मला दादासाहेब फाळके पुरस्कार’ वयाच्या 88 वर्षी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आभार. नवोदित कलाकारांना चांगलं काम करण्याचा, शिस्तीत राहण्याचा आणि कितीही गगनभरारी घेतली तरी जमिनीवर राहण्याचा मी सल्ला देत आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचं अभिनंदन”.

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे. 1954 साली या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे. तर ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा भारतीय सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. यंदा आशा पारेख यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *