गुजरातमधील वडोदरा येथील घटना
वडोदरा : कंटेनरने एका वडाप रिक्षाला दिलेल्या धडकेत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला. गुजरातमधील वडोदराजवळ राष्ट्रीय महामार्गावरील दार्जिपुराजवळ आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
कंटेनर ट्रकने प्रवासी घेऊन जाणाऱ्या तीन दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांना वडोदरा शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 10 मृतांमध्ये दोन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.
चालकाचे कंटेनर ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि प्रथम एका कारला धडकली. नंतर कंटेनरला एका तीनचाकीने धडक दिली. त्यामुळे तीनचाकी वाहनाचा पूर्ण चुराडा झाला.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta