पणजी : गोव्यात जाणाऱ्या मद्यप्रेमींना आता बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याचं कारण म्हणजे राज्य सरकारने अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिअरच्या किंमतीत १० ते १२ रुपयांची वाढ होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधी घोषणा केली आहे.
गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईट बिअरसाठी प्रत्येक बाटलीमागे १५ रुपये तर स्ट्राँग बिअर २० ते २५ आणि प्रीमियम बिअर ३० रुपयांनी महाग होईल. गोव्यात बिअरला स्थानिकांकडून सर्वात जास्त मागणी असते. पर्यटक भारतीय बनावटीच्या परदेशी मद्याला पसंत देतात असंही त्यांनी सांगितलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta