नवी दिल्ली : आज दि. १७ पासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केले. मतदान करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले या निवडणुकीची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या दरम्यान, कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वडेरा यांनीही मतदान केले.
मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट मुकाबला होणार आहे. खर्गे यांचे पारडे जड मानले जात आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 देशभरातील 40 केंद्रांवर मतदान होत आहे. एकूण 9800 प्रदेश प्रतिनिधी मतदानात भाग घेणार आहेत. खर्गे हे बंगळूर येथे तर शशी थरूर हे तिरूअनंतपूरम येथे मतदान केले. कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयात प्रथम पी. चिदंबरम यांनी मतदान केले. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका वडेरा, जयराम रमेश आदी दिग्गज नेत्यांनी मतदान केले.
Belgaum Varta Belgaum Varta