केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व सहाजणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी बचाव पथक पाठवलं आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्प येथून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केलं आणि केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.
उत्तराखंडमधील फाटा भागात हा अपघात झाला. यात सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी माहिती दिली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन या कंपनीचं असल्याची माहिती मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta