Saturday , November 9 2024
Breaking News

छठ पूजेदरम्यान भीषण घटना, 30 हून अधिक जळाले, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Spread the love

 

पटना : बिहारच्या औरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरातील सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. दरम्यान या झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे 30 हून अधिक जण जळाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज परिसरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज पहाटे अडीचच्या सुमारास परिसरातील अनिल गोस्वामी यांच्या घरी छठ पुजेचा कार्यक्रम सुरू होता. घरातील सर्व सदस्य प्रसाद बनवण्यात व्यस्त होते. यादरम्यान घरातील सिलिंडरला आग लागली. त्यामुळे गॅस गळती होऊन आग वेगाने पसरली. यानंतर चेंगराचेंगरी झाली. काही लोकांनी आग विझवण्यास सुरुवात केली. पण आग आणखीनच वाढत गेली.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस व अग्निशमन दलाला स्थानिकांनी याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. पण हळूहळू आग वाढत गेली आणि अचानक घराचा स्फोट झाला. ज्यामध्ये 30 हून अधिक लोक होरपळले असून गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर सर्व जखमींना औरंगाबादच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले परंतु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

घटनास्थळी बचावकार्य करताना पोलीस ही जखमी झाले होते. यामध्ये महिला कॉन्स्टेबल प्रीती कुमारी, अखिलेश कुमार, जगलाल प्रसाद, सैफ जवान मुकुंद राव, जगलाल प्रसाद, ड्रायव्हर मोज्जम आणि शहागंज, नगर परिषदेचे अध्यक्ष अनिल ओडिया, पंकज वर्मा, राजीव कुमार, मोहम्मद शबदीर आदींचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

राजस्थानात बसचा भीषण अपघात; १२ प्रवाशांचा मृत्यू

Spread the love  सीकर : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *