Thursday , September 19 2024
Breaking News

भाजपच्या पहिल्या यादीत हार्दिक पटेल, रवींद्र जाडेजाच्या पत्नीचे नांव!

Spread the love

 

अहमदाबाद : गुजरातमध्ये होणार्‍या आगामी दोन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या टप्प्यासाठी 160 उमेदवारांची नावे जाहीर केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपने जामनगर उत्तरमधून क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या पत्नी रिवाबा यांना तिकीट दिले आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी मजुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
हार्दिक पटेल यांना विरमगाममधून तिकीट
काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
गुजरातमध्ये भाजपकडून 38 आमदारांची तिकिटे कापली
भाजपने गुजरातमधील 69 विद्यमान आमदारांची तिकिटे परत केली, म्हणजेच त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर 38 आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. एकूण 160 उमेदवारांपैकी 38 नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *