Saturday , December 21 2024
Breaking News

जनरल बिपिन रावत यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार

Spread the love

नवी दिल्ली : भारताच्या तीन दलांचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. संसदेत या संदर्भात त्यांनी माहिती जाहीर केली. तसेच घडलेल्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम जाहीर केला. त्यावेळी संसदेतील उपस्थित सदस्यांना देखील गहिवरून आले.
दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी हवाई दलामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. एअर चीफ मार्शल यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. इंडियन एअरफोर्सकडून एअर मार्शल मानिंदरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पथकानं कालच वेलिंग्टनला पोहोचून आपलं काम सुरू केलं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि इतर सर्व सहकार्‍यांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितला.
देशाचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालं. या अपघातात बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 13 जणांचं दुर्दैवी निधन झालं असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. यांच्यावर वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताविषयी आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन दिलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी नेमकं अपघातावेळी काय घडलं, याविषयी देखील लोकसभेत सविस्तर माहिती दिली. राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा 27 मिनिटांचा होता. 11 वाजून 48 मिनिटांनी हेलिकॉप्टरनं एअरबेसवरून उड्डाण घेतलं. हे हेलिकॉप्टर 12 वाजून 15 मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होतं. पण सुलुल एअरबेसचा 12 वाजून 8 मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर 20 मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. दरम्यान, काही स्थानिकांना जंगलातल्या एका भागातून धूर येताना दिसल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. जंगलात काही स्थानिक लोकांना आग लागल्याचं दिसलं. ते धावत तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना एका लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष आगीत जळत असलेले दिसले. बचाव पथकानं लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जितक्या लोकांना वाचवणं शक्य होतं, त्यांना लागलीच वेलिंग्टनच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात 14 पैकी 13 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *