Tuesday , March 3 2026
Breaking News

ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन; पोलिस अधिकाऱ्यानं केला होता गोळीबार

Spread the love

 

ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते. दास यांच्यावर अपोलो हॉस्पिटमलमध्ये उपचार सुरु होते.

60 वर्षीय दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधी चौकात आपल्या कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दासने त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गुप्तेश्वर भोई यांनी सांगितले होते की, नबा दास यांच्या छातीवर डाव्या बाजूला गोळ्या लागल्या आहेत.

एएसआयच्या रिव्हॉल्व्हरमधून काही गोळ्या लागल्याने शेजारी असलेला एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *