Monday , December 8 2025
Breaking News

“परत कधीच नितीश कुमारांबरोबर आघाडी केली जाणार नाही” बिहार भाजपाच्या कार्यकारिणीकडून ठराव मंजूर

Spread the love

 

पाटणा : बिहारमधील दरभंगा येथे दोनदिवसीय बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या बिहार यूनिटने रविवारी जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार यांच्यासोबत परत कधीच आघाडी न करण्याचा ठराव मंजूर केला. राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी ठरावास दुजोरा देत म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय भाजपा नेतृत्वाने निर्णय घेतला आहे की, भाजपा परत कधीच नितीश कुमारांसोबत आघाडी करणार नाही.”

सुशील मोदी यांनी हेही सांगितले की, “भाजपा आणि जनादेशाचा वारंवार विश्वासघात करणारे नितीश कुमार बिहारच्या राजकारणात ओझं बनले आहेत. त्यांच्याकडे जनाधार नाही आणि मत मिळवण्याची क्षमता. त्यांची कुवत आता विधासभेत १०-१५ जागा जिंकण्याचीही राहिलेली नाही.”

“जदयूला २०२०च्या विधानसभा निवडणुकीत ४३ जागा यामुळे जिंकता आल्या, कारण भाजपाने आपली संपूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान मोदी स्वत: बिहारमध्ये येऊन प्रचार करत होते. पंतप्रधान मोदींनी नितीश कुमारांसाठी मतं मागितली नसती, तर स्वबळावर त्यांच्या पक्ष लोकसभेच्या १५ नाही केवळ दोन जागाच जिंकला असता. भाजपा आता राजकीय ओझं मुक्त झाल्याचा अनुभव घेत आहे आणि आनंदी आहे की ते सोडून गेले. आता भाजपा स्वत:च्या बळावर २०२५ मध्ये बिहारमध्ये सरकार बनवेल.” असंही सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *