Monday , December 8 2025
Breaking News

तुर्कस्तानात भूकंपाचे तब्बल 39 धक्के, 2500 हून अधिक मृत्यू

Spread the love

 

 

लागोपाठ झालेल्या भूकंपाच्या दोन मोठ्या धक्क्यांनंतरही तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के बसणं सुरूच आहे. गेल्या 24 तासात या देशात भूकंपाचे तब्बल 39 धक्के बसले असून आतापर्यंत 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी 1 वाजून 24 मिनीटांनी दुसरा धक्का बसला. आतापर्यंत सात हजाराहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत.

तुर्कीत गेल्या 24 तासात भूकंपाचे 39 धक्के
एक मोठा भूकंप झाल्यानंतर त्यानंतर इतर काही लहान-लहान भूकंपांची मालिका सुरू होते. तुर्कीमध्येही पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याची डेप्ट ही 18 किमीची होती. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. गाझियनटेप हे भूकंपस्थानापासून सीरिया हा देशही जवळ आहे. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता तुर्की आणि सीरियामध्ये जाणवली असून त्यामध्ये आतापर्यंत 1400 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

मदतकार्य जोरात सुरू
तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू झालं आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीसह सीरियामध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपाचा फटका सर्वच प्रमुख शहरांना बसल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. त्यामुळे बचाव आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणावर चालवले जात आहे.

एर्दोगन यांनी बोलावली तातडीची बैठक
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तातडीची बैठक घेतली, त्यामध्ये भूकंपग्रस्तांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आदेश दिले आहेत. अनेक देश आपत्तीग्रस्त तुर्कीला मदत करणार आहेत. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

तीन दिवसांपूर्वी भूकंपाचा इशारा देण्यात आला होता
युरोपातील एका शास्त्रज्ञाने या भूकंपाचा अंदाज तीन दिवसांपूर्वी वर्तवला असल्याची माहिती आहे. नेदरलँडचे शास्त्रज्ञ फ्रँक हॉगरबिट्स यांनी 3 फेब्रुवारीला याबाबत ट्वीट केले होते. ते म्हणाले होते की आज नाही तर उद्या, पण लवकरच या भागात 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप येणार आहे. शास्त्रज्ञ फ्रँक हॉगरबाइट्स यांनी केलेल्या ट्विटमध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनला प्रभावित करेल असं म्हटलं आहे.

बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडचण
भूकंपाच्या दरम्यान तुर्कस्तानच्या अनेक भागात तापमान शून्याच्या खाली नोंदवण्यात आले आहे. सध्या देशात कडाक्याची थंडी पडत आहे. भूकंपामुळे येथील विमानतळाच्या धावपट्टीचे नुकसान झालं आहे. बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यातही अडचण निर्माण झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *