अमेरिकेतील मेक्सिकोमधील स्थलांतरित सुविधा केंद्राला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३६ स्थलांतरितांचा होरपळून मृत्यू तर २९ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे. टेक्सासमधील एल पासोजवळ असलेल्या सिउदाद जुआरेझ येथील केंद्रात सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.
अमेरिकेत येणार्या स्थलांतरितांसाठी उत्तर मेक्सिकोमध्ये स्थलांतरीत सुविधा केंद्र आहे. अमेरिकेत जाण्याच्या प्रतीक्षेत असणारे स्थलांतरित येथे वास्तव्यास असतात. सोमवारी रात्री या केंद्रात भीषण आग लागली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २९ जण गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेचा तपास मेक्सिकोच्या अटर्नी जनरल कार्यालयाने तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta