Thursday , September 19 2024
Breaking News

केरळमधील ‘रेल्वे जळीतकांडा’त तिघांचा मृत्‍यू, दहशतवादी कटाचा पोलिसांचा संशय

Spread the love

 

केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये एकाने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिले. यामध्ये जाळलेल्या व्यक्तीसोबतच आठ सहप्रवासी पेटले गेले. रविवारी (दि.०२) रात्री अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेस रेल्वेच्या D1 डब्यात ही धक्‍कादायक घटना घडली. या घटनेनंतर रेल्वे रुळावर एक बॅगही सापडली असून, ही बॅग आरोपींची आहे का? की यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी हा दहशतवादी कट देखील असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे.

सध्या तरी या घटनेला माओवादी किंवा दहशतवादी बाजू असू शकते, हे नाकारू शकत नसल्याचा संशय केरळचे पोलीस महासंचालक अनिल कांत यांनी म्‍हटले आहे. घटना घडल्यापासून १०० मीटर अंतरावर रेल्वे रुळावर तीन मृतदेह आढळून आले आहेत. यामधील मृत व्यक्ती हे तिघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर हि घटना वैयक्तिक वैमनस्यातून झाली आहे की, हे भयंकर दहशतवादी कारस्थान असू शकते? यांसदर्भात शोध घेण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पोलिसांना एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेदरम्यान प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढल्यानंतर रेल्वेचा वेग कमी झाला, तेव्हा संबंधित संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर इतर प्रवाशांनी रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) माहितीनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग तातडीने आटोक्यात आणली. अद्याप तरी या घटनेतील संशयिताची ओळख पटलेली नाही.

जखमींपैकी काही व्यक्तींनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने पेट्रोल किंवा रॉकेल असे ज्वलनशील पदार्थ शिंपडले आणि आग लावली. एका महिला प्रवासी म्‍हणाली की, तिला पाण्याचे थेंब तोंडावर पडल्यासारखे वाटले. यानंतर अचानक आगीचा भडका उडाला. जेव्हा ट्रेन एलाथूर पुलावर पोहोचली तेव्हा ती थांबली आणि प्रवासी घाबरून एका डब्यातून बाहेर पडताना दिसले. दरम्यान या घटनेनंतर रेल्‍वेतील एकच खळबळ उडाली. प्रवशांमध्‍ये चेंगराचेंगरी झाली.

या जळीतकांडाच्या घटनेत सरकारी रेल्वे पोलिसांनी कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 326 अ (स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), 436 (आग किंवा स्फोटक पदार्थाने दुष्कृत्य करणे), आणि भारतीय दंड संहितेच्या 438 आणि कलम 151 (हेतुपूर्वक नुकसान) आणि (रेल्वे मालमत्तेचा नाश) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *