जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील पिचनाड माछिल भागात बुधवारी (दि.०३) सुरक्षा दल आणि दहशतवादांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळी भारतीय लष्काराचे जवान आणि कुपवाडा पोलिसांकडून गस्त घालण्यात येत असून, सोधमोहिम सुरू आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
शोध मोहिम अद्याप सुरूच असून, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि गटाशी संलग्नता तपासली जात आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta