मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न युक्रेनने केल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनने मंगळवारी रात्री क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची हत्या करणे हा त्याचा उद्देश होता. मॉस्कोच्या रहिवाशांनी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ नंतर लगेचच क्रेमलिनच्या भिंतींच्या मागे स्फोट झाल्याचे ऐकले. यानंतर क्रेमलिनच्या आकाशात धुराचे लोट उठताना दिसले. एका स्थानिक टेलिग्राम चॅनलने स्थानिक रहिवाशांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ फुटेज देखील शेअर केले आहेत. मात्र, या हल्ल्यात युक्रेनचा सहभाग असल्याची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही.
रशियाने युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनने पुतिन यांना मारण्यासाठी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोनने हल्ला केला. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहे.
रशियाने बुधवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, पुतीन यांच्या हत्येच्या प्रयत्नात क्रेमलिनवर मंगळवारी (दि.२) रात्री दोन ड्रोनने हल्ले करण्यात आले. रशियाने याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. रशियाचे म्हणणे आहे की त्यांनी युक्रेनने बनवलेले दोन ड्रोन यशस्वीपणे पाडले आहेत.
रशियाने घेणार बदला
रशियन न्यूज एजन्सी टासच्या म्हणण्यानुसार, जिथे आणि जेव्हा योग्य वाटेल तेव्हा बदला घेण्याचा अधिकार आता रशिया असल्याचे धमकी रशियाने युक्रेनला दिली आहे. रशियाने या घटनेला नियोजित दहशतवादी हल्ला आणि रशियाच्या अध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न म्हटले आहे. रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की युक्रेनने दोन ड्रोनद्वारे क्रेमलिनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ड्रोन पाडण्यात आले आहेत. या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
Belgaum Varta Belgaum Varta