Wednesday , December 10 2025
Breaking News

सैन्य अ‍ॅक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू

Spread the love

 

जम्मू : जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातील अंडवान सागरम भागात आज (दि.१४) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. याबाबत पोलिसांनी रविवारी (दि.१४) सकाळी ट्विट करत सांगितले. सध्या दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादी सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने घुसून लष्कराच्या जवानांवर हल्ले करत आहेत.
याआधी शनिवारी (दि.१३), भारतीय लष्कराच्या जवानांनी पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ३ मे रोजीही भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लाच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवादी ठार केले होते. दहशतवाद्यांसोबत असलेली एके-47 ही जप्त करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *