कराची : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी भ्रष्टाचार प्रकरणी अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तर दुसरीकडे, पाक लष्कराने इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. पाक लष्कर इम्रान खानविरोधात आर्मी ऍक्ट आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टचा वापर करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या कायद्यात मृत्युदंड आणि जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
इम्रान खानविरोधात पाक लष्कराची कठोर भूमिका
आर्मी ऍक्ट आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट लागू करण्याचा लष्कराचा निर्णय ही एक गंभीर तरतूद आहे. ज्यामध्ये इम्रान खान, त्यांच्या पक्षाचे नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांवर मृत्युदंड किंवा जन्मठेपेच्या शिक्षेचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.
Belgaum Varta Belgaum Varta