Thursday , September 19 2024
Breaking News

‘एनआयए’चे वेगवेगळ्या गुन्ह्यांसदर्भात ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

Spread the love

 

नवी दिल्ली : एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) चे बुधवारी हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. एनआयए ने गेल्या वर्षी दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या संदर्भात छापे टाकले जात आहेत. यामध्ये दहशतवादी अमली पदार्थ तस्करी आणि संबंधित गुंडांसोबतच्या संगनमत प्रकरणांचा समावेश आहे. एएनआयने याचे वृत्त दिले आहे.

गॅंगस्टर, खलिस्तानी समर्थक तसेच तस्करांचे संघटित जाळे उध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अँक्शन मोडमध्ये आली आहे. बुधवारी सहा राज्यातील १०० हून अधिक ठिकाणी संस्थेने छापे टाकले. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी विश्व हादरले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय गुंड, खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या कारवायांमुळे हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्यप्रदेशात या धाडी टाकण्यात आल्या. केंद्रीय संस्था आणि राज्य पोलीस दलाकडून पाकिस्तान, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह देशाच्या विविध भागात लपून बसलेले संघटित गुन्हेगार आणि दहशतवाद्यांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दहशतवाद, हिंसाचार आणि गुन्हेगारी प्रकरणातील आरोप या कारवाईतून हाती आले आहेत. दहशतवादी आणि गुन्हेगारांच्या टोळ्या सायबरस्पेसचा वापर करीत दहशतवादी आणि हिंसाचाराच्या कृत्याचा प्रचार करीत दहशत माजवत आहेत. हत्या आणि खंडणीचे कट अनेक राज्यातील वेगवेगळ्या तुरूंगातून रचले जात आहेत.विशेष म्हणजे परदेशातील एक संघटित नेटवर्कद्वारे हे अंमलात आणले जात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी गेल्या सात महिन्यात गॅंगस्टर-दहशतवाद्यांशी संबंधित २०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान एके-४७, ग्रेनेड लॉन्चर आणि हॅन्डग्रेनेडसह इतर शस्त्रे आणि दारुगोळा देखील हस्तगत करण्यात आला. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील पोलिसांनी गुंडाचे जाळे उध्वस्त करण्यासाठी एकत्रित या धाडी टाकल्या आहेत.

मुंबईमध्ये १९९० च्या दशकात ज्याप्रमाणे गुन्हेगारांचे ‘इकोसिस्टीम’ तयार झाली होती, त्याचप्रमाणे आता गुन्हेगार सक्रिय झाले आहेत असे एनआयएने मार्च महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रातून सांगितले होते.गत सात महिन्यात एनआयएने ७ राज्यांमध्ये २०० हून अधिक ठिकाणी धाडी टाकत लपून बसलेले ३० गुंडांना त्यांच्या साथीदारांसह अटक केली होती. १३ मालमत्ता जप्त करीत ९५ बॅंक खाती देखील गोठवण्यात आली आहे. गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांविरोधात २० लुकआउट नोटीस देखील काढण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *