तेलुगु दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे वयाच्या ७१ वया वर्षी निधन झालं. सरथ बाबू यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. दीर्घकाळ आजारी असल्यामुळे त्यांच्य़ावर हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होता. सरथ बाबू यांना रुग्णालयात दाखल करून एक महिन्यांहून अधिक काळ झाला होता. सोमवारच्या सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि अनेक अवयव निकामी झाले. आज २२ मे रोजी त्यांचे निधन झाले.
सरथ बाबू यांचा जन्म ३१ जुलै, १९५१ रोजी आंध्र प्रदेशातील अमदलावलसा येथे झाला होता. क्रिमिनल (१९९४), उथिरी पुक्कल (१९७९) आणि शिरडी साईं (२०१२) यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. १९७३ मधील ‘राम राज्यम’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. २०१७ मधील ‘मलयन’ साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा तामिळनाडू राज्य पुरस्कार देण्यात आला होता.
सरथ बाबू यांनी १९७४ मध्ये अभिनेत्री रमा प्रभा यांच्याशी लग्न केले होते. त्यांचे हे लग्न वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत चालले. १९८८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर त्यांनी १९९० मध्ये स्नेहा नांबियारशी लग्न केले. २०११ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.