जयपूर : उत्तर भारत आणि पाकिस्तान-पंजाब सीमेवर तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम राजस्थानात दिसत आहे. राजस्थानात गेल्या चार दिवसांपासून वादळी वारे, गारपीठासह मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. फतेपूर शहरात ४ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. मागील ४ दिवसांमध्ये शहरामध्ये १०६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.तर आज ( दि. २७) ५२ मिमी इतका पावसाची नोंद झाली आहे. जोरदार वारे, गारपीठ आणि मुसळधार पावसामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून यात ५ बालकांचा समावेश आहे.
जोरदार पावसामुळे फतेपूर शहरातील मुख्य बस स्टँडला बेटाचे स्वरुप आले आहे. रुग्णालयांच्या बाहेरसुद्धा पाण्याची तळी साठली आहेत. चुहूबाजूनी फक्त फक्त पाणीच पाणी पसरले असल्याचे चित्र आहे. शनिवारी बसरलेल्या तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत केले. फेतपुरातील बबूना शाळेजवळ एका शेतकऱ्याच्या जनावरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत मुख्य रस्ता जाम करुन टाकला. या शिवाय मुख्य बस स्थानकात चारचाकी वाहन तरंगताना आढळून आले.
सीकर जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यांमुळे विजेचे खांब कोसळले आणि ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने वीजपुरवठा सुरू अेनक तास खंडीत झाला होता. वादळात शेकडो घरे व झाडे पडली आहेत. सुमारे तीन तासांहून अधिकाळ पडलेल्या पावसामुळे परिसरात पाणी तुंबले. तर सखल भाग पाण्याखाली गेला आहे. वादळामुळे परिसरात अनेक ठिकाणी भिंती कोसळल्या आहेत. परिसरात ७० किमी पेक्षा जास्त वेगाने आलेल्या वादळामुळे घरांच्या छपरे उडून गेली तर छतावर बसविण्यात आलेल्या टिनशेड आणि सोलर सिस्टीमचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला इशारा
हवामान खात्याने जयपूरमध्ये पुन्हा २७,२८ आणि २९ मे रोजी मुसळधार पाऊस, जोरदार वादळ आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या दरम्यान ७० किमी प्रतितास वेगाने धुळीचे वारे वाहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासह २८-२९ मे रोजी बिकानेर, जोधपूर, अजमेर, जयपूर, भरतपूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये तीव्र वादळ, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
Belgaum Varta Belgaum Varta