जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये अमृतसरहून कटराला जाणारी बस खोल दरीत कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जम्मू उपायुक्त कार्यालयाने सांगितले. ही बस रियासी जिल्ह्यातील कटरा येथे जात होती.
सीआरपीएफ, पोलिस आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. अमृतसरहून येणाऱ्या या बसमध्ये बिहारचे प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे.