अमेरिकेतील अॅनापोलिस या शहरातील एका घरात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. तर इतर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडलेले अॅनापोलिस हे शहर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. पासून ३० मैलावर म्हणजेच सुमारे ५० किमीवर आहे, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ ने दिले आहे.
गोळीबाराची ही घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडली आहे. अमेरिकेतील अॅनापोलिस या शहरातील पॅडिंग्टन प्लेसच्या 1000 ब्लॉकमधील एका घरात गोळीबार झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याला मिळाली. त्यानंतर त्याने तक्रार केल. त्यानंतर स्थानिक अधिकारी आणि साक्षीदारांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या घटनेतील एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तपासातून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आंतर्गत वादातून घडली असल्याची माहिती पोलिलांनी दिली आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta