Monday , December 8 2025
Breaking News

बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम, खराब हवामानामुळे काही उड्डाणं रद्द तर काही विलंबाने

Spread the love

 

नवी दिल्ली : गुजरातच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार असून पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम झाल्याचं दिसून येतंय. एअर इंडिया, स्पाईसजेटकडून बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस विमान सेवेवर परिणाम होणार असल्याची माहिती आहे.

काही उड्डाण रद्द होण्याची शक्यता

बिपरजॉय चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे एअर इंडियाची काही उड्डाण सेवा रद्द करण्यात आली आहेत, तर काही उड्डाण सेवा विलंबाने असल्याची माहिती माहिती आहे. स्पाईसजेटकडून मुंबई, भावनगर, कांडला, अहमदाबाद येणाऱ्या आणि जाणाऱ्या सेवा प्रभावित होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान, इतर एअर कॅरिअर्सकडून बिपरजॉयमुळे चक्रीवादळामुळे सेवा प्रभावित होणार की नाही याबद्दल अधिकृत माहिती नाही.

हवामान विभागाने आज दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पूर्व-मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर बिपरजॉय चक्रीवादळाला अत्यंत तीव्र चक्रीवादळ म्हटलं आहे. हवामान विभागाने पुढे सांगितलं आहे की, ‘पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्रतेने बिपरजॉय चक्रीवादळ 5 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकलं आहे. आज, 12 जून, 2023 रोजी चक्रीवादळ पूर्व मध्यभागी 05.30 तास IST येथे केंद्रीत झालं. तसेच चक्रीवादळ लगतचा ईशान्य अरबी समुद्र अक्षांश 19.2°N आणि रेखांश 67.7°E जवळ, पोरबंदरपासून सुमारे 340 किमी नैऋत्येस, देवभूमी द्वारकेच्या 380 किमी नैऋत्येस, जाखाऊ बंदराच्या 460 किमी दक्षिणेस, 470 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि नैऋत्येस 470 किमी अंतरावर कराची (पाकिस्तान) येथे होतं.

चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं

बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारी ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती आहे. बिपरजॉय मांडवी ते कराची दरम्यान कुठे धडकणार अद्याप यासंदर्भात स्पष्टता नाही.

बिपरजॉय उत्तरेकडे सरकण्याची शक्यता

बिपरजॉय चक्रीवादळ 14 जूनला सकाळपर्यंत जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. यानंतर चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकून 15 जूनच्या दुपारपर्यंत जखाऊ बंदर (गुजरात) जवळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यानची सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतची पाकिस्तान किनारपट्टी पार करेल. यावेळी तीव्र चक्रीवादळ बिपरजॉयमुळे वाऱ्याचा वेग 125-135 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *