नवी दिल्ली : देशाची पहीली सेमी हायस्पीड विना इंजिनाची ट्रेन ‘वंदेभारत एक्सप्रेस’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेग आणि आरामदायीपणा यांचा मिलाफ असलेल्या या गाड्या देशातील विविध राज्यात चालविल्या जात आहेत. धार्मिक पर्यटनासाठी देखील वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. आता येत्या 26 जून रोजी देशातील आणखी पाच मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेसना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला पाचवी वंदेभारत मिळणार आहे. ती कोणती ते पाहा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 26 जूनला पाच नवीन मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी या पाच नव्या वंदेभारतला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या ट्रेनमध्ये कोकण रेल्वे मार्गावर मुंबई (सीएसएमटी) ते गोवा (मडगाव), बंगळुरू-हुबळी, पाटणा – रांची, भोपाळ – इंदौर आणि भोपाळ – जबलपूर या पाच वंदेभारतचे लॉंचिग होणार असल्याचे म्हटले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta