लंडन : लंडनमधील वेम्बली येथे हैदराबादमधील एका २७ वर्षीय महिलेचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या कोन्थम तेजस्विनीची हत्या एका ब्राझिलियन व्यक्तीने केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता तेजस्विनी सह तिच्या आणखी एका रुमेटवर या ब्राझिलियन व्यक्तीने हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी २८ वर्षांची महिला जखमी असल्याचे समजते. ही घटना वेम्बलीच्या नील क्रिसेंट येथे घडली आहे.
वेम्बलीच्या नील क्रेसेंट भागात राहणाऱ्या तेजस्विनी आणि तिच्या रूममेटवर एका हल्लेखोराने चाकूने हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तेजस्विनीला मृत घोषित केले, तर दुसऱ्या महिलेवर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली.
हैदराबादमध्ये राहणारा तेजस्विनीचा चुलत भाऊ विजय याने सांगितले की, आरोपी ब्राझीलचा असून तो आठवड्यापुर्वीच तेजस्वीन राहत होती तेथे राहायला आला होता. तेजस्विनी गेल्या वर्षी मार्चमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी लंडनला गेली होती.
तेजस्वीनीच्या शवविच्छेदनानंतर पोलिस अधिकृतपणे तेजस्वीनीची ओळख जाहीर केली. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी यापूर्वी ब्राझिलियन नागरिक केविन अँटोनियो लॉरेन्को डी मोराइसचा फोटो जारी केला होता आणि मंगळवारी सकाळी झालेल्या हल्ल्यातील संशयित म्हणून त्याला शोधण्यासाठी जनतेची मदत मागितली होती.
वेम्बली येथील नील क्रिसेंट या गुन्ह्याच्या ठिकाणाजवळील हॅरो येथून आता तेवीस वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक अटक केली आहे. पोलिसांनी हत्येच्या संशयावरून त्याला अटक केली असून त्याला उत्तर लंडन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर अधिकृत आरोप निश्चितझाल्यानंतरच त्याची ओळख उघड करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की दोन महिलांवर वार करण्यात आले होते आणि आपत्कालीन सेवा कर्मचार्यांनी सर्वोत्तम प्रयत्न करूनही तेजस्विनीला वाचवता आले नाही. दुसरी महिलेची सध्या ठीक आहे आणि तिच्यावर उपचार केले जात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta