Monday , December 8 2025
Breaking News

चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार; सहारनपूरमध्ये झाला प्राणघातक हल्ला

Spread the love

 

लखनौ : भीम आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाला. आझाद जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली असल्याची माहिती आहे. कारचे काचाही फुटल्या आहेत. गोळीबारानंतर चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एसएसपी डॉ. विपिन टाडा सहारनपूर यांनी पोलीस महासंचालक विजय कुमार यांना फोनवरून घटनेची संपूर्ण माहिती दिली.

गोळीबाराच्या या घटनेनंतर भीम आर्मीने संताप व्यक्त केला आहे. आरोपींना तातडीने अटक करावी आणि चंद्रशेखर आझाद रावण यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी करण्यात आली आहे. आरएलडीचे स्थानिक आमदार मदन यांनी सांगितले की, सध्या रावण यांची प्रकृती स्थिर असून कोणाताही धोका नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चंद्रशेखर आझाद यांनी काय म्हटले?
चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले की, गोळीबार झाला तेव्हा माझ्यासोबत काहीजण होती. गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नाही. मात्र, माझ्या सोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील. गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली. तर, आमच्या कारने यु-टर्न घेतला. हल्ला झाला तेव्हा माझ्या लहान भावासोबत आम्ही पाचजण कारमध्ये होतो.

पोलिसांनी काय म्हटले?
या घटनेबाबत बोलताना एसएसपी डॉ. विपिन टाडा यांनी सांगितले की, चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हे हल्लेखोर कारमधून आले होते. हल्लेखोरांची एक गोळी आझाद यांच्या कमेरजवळून गेली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे,. हल्लेखोरांनी वापरलेल्या कारवर हरयाणा राज्याची नंबर प्लेट होती, अशी माहिती समोर आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *