मुंबई : पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे. या आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिलं होतं.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे हेदेखील उपस्थित होते. या दोन्ही खासदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून पक्षाच्या रजिस्ट्रीमधून त्यांच्या नावाची नोंदणी रद्द करण्यात यावी असा आदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta