Monday , December 8 2025
Breaking News

केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकांसाठी कायमच रणनिती आखली जाते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत भाजपमध्ये चाणक्यनिती करत अनेक संघटनात्मक व पक्षीय बदल घडवले जातात. सध्या भाजपाकडून मिशन लोकसभा आखण्यात आलं असून त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आलीय. तत्पूर्वी आता ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्याचाच, भाग म्हणून भाजपच्या केंद्रीय समितीने ५ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले असून नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपाने तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि झारखंड राज्यात संघटनात्मक बदल केले आहेत. तेलंगणात भारतीय राष्ट्र समितीला टक्कर देण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असून येथे केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी केंद्रीयमंत्री डी. पुरंदेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांना झारखंड राज्याची जबाबदारी दिली असून पंजाबमध्ये सुनिल जाखड यांच्याकडे पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य बनवले आहे. एप्रिल महिन्यातच ते भाजपमध्ये सहभागी झाले होते. तर, एटाला राजेंद्र यांना तेलंगणात भाजप निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशानुसार या सर्व नियुक्त्या करण्यात आल्याचे भाजपने अधिकृतपणे सांगितले आहे. तत्काळ प्रभावाने या नियुक्या लागू करण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *