बेळगाव : धर्मादाय खात्याच्या यादीत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भक्ताने मोबाईल स्विच ऑफ करावेत मंदिरात बसून संभाषण करणे, संगीत ऐकणे, तयार करणे किंवा छायाचित्रण करणे या सर्व बाबतीत निर्बंध घालण्यात आले आहे, असे धर्मादाय खात्याने सोमवारी या संबंधाची अधिकृत आदेश जारी केला आहे.
यापूर्वी तामिळनाडूमध्ये मंदिरात मोबाईल वापरावर सरकारने निर्बंध घालण्यात आले होते. केदारनाथ येथे ही असाच आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. या पाठोपाठ कर्नाटकातही हा आदेश सरकारने जारी करण्यात आला आहे. सरकारच्या आदेशानुसार बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्वर मंदिर, टिळकवाडी साई मंदिर, अनगोळ येथील हरी मंदिर, समादेवी गल्लीतील समादेवी मंदिर, वीरभद्र मंदिर, पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज मंदिर, सौंदत्ती येथील यल्लमा मंदिर, रायबाग तालुक्यातील चिंचली मायाक्का मंदिर, बडकुंद्री येथील होळंम्मादेवी मंदिर या मंदिरांमध्येही भाविकांना मोबाईलचा वापर करता येणार नाही असा आदेश बजवला आहे.
मंदिर आवारात अलीकडे मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलच्या वापरामुळे भाविकांना एकाग्रतेणे दर्शन करणे शक्य होत नाही. भक्तांना शांतता मिळत नाही. यासाठी धर्मादाय खात्याच्या यादीत येणाऱ्या राज्यातील सर्व मंदिरांमध्ये येण्यापूर्वी भाविकांनी मोबाईल स्विच ऑफ करावेत असा आदेश खात्याचे सचिव के पी हेमंत राजू यांनी जारी केला आहे. मंदिरांमध्ये या विषयाच्या सूचना फलक लावण्यात यावेत असे मंदिराच्या ट्रस्ट नाव आदेश देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta