मुंबई : देशात मणिपूरसह काही राज्यांमध्ये दंगली होत आहेत. मणिपूरमध्ये तर गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परवा तर संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेला. त्यामुळे या भागातील वातावरण तापलं आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा कट सुरू आहे. पण महाराष्ट्रात दंगली होणार नाही. राज्यातील जनता सूज्ञ आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते.
मणिपूर, राजस्थान, हरियाणा आण दिल्लीच्या सीमेवर दंगली घडवण्यात येत आहे. काही ठिकाणी झाल्या आहेत. महाराष्ट्रात तशा दंगली घडाव्या म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप आणि त्यांचं गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे. या राज्यात दंगलीची आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनता सूज्ञ आहे. अशा कटकारस्थानाला बळी पडणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta