Wednesday , March 4 2026
Breaking News

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट नाहीत’; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला उत्तर

Spread the love

 

अजित पवार केवळ संभ्रम निर्माण करत आहेत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे त्यात कोणतीही फूट पडलेलली नाही. पक्षात दोन गट पडलेले नाहीत, शिवाय कोणतेही वाद नाहीत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यानुसार अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती. आता शरद पवार गटाने उत्तर देताना पक्ष आमचाच असून अजित पवार केवळ संभ्रम निर्माण केला आहे अशी माहिती दिली आहे.

अजित पवारांची मागणी फेटाळली पाहिजे
शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून पक्षात कोणतेही गट पडलेले नाहीत. अजित पवार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवर आमचा आक्षेप घेऊन आम्ही 3 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक प्रतिसाद दाखल केला होता. अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा करण्यात आलेली मागणी फेटाळावी. पक्षात दोन गट पडले आहेत याचा कोणताही पुरावा अजित पवारांकडे नाही. निवडणूक आयोगाने देखील कोणताही वाद आहे असे ठरवलेले नाही. याच आधारावर अजित पवार यांची कागदपत्रे फेटाळली पाहिजेत.

राष्ट्रवादीच्या चिन्हावर दावा करणे अकाली
घटनेच्या विरोधात काम करत असलेल्या प्रवृत्त व्यक्तींच्या अपरिचित गटाच्या चुकीच्या दाव्यांचे खंडन करण्यास आम्ही बांधील नाही. कारण, 1 जुलै 2023 पूर्वी अजित पवार यांनी कोणतीही तक्रार केली नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही बैठकीला विरोध केला नव्हाता. त्यामुळे याचिका दाखल करणे अकाली आहे,म्हणून त्यांची मागणी नाकारली पाहिजे, असे देखील शरद पवार म्हणाले.

अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी पक्ष आपल्या सोबत असल्याबाबतचे दावे करणारे जे दाखले अजित पवार गटाने दिले ते देखील खोटे असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवलं त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. पक्षात फूट पडली नाही असं आम्ही सांगितलं आहे. पक्षात फूट पडली नाही असं देखील सांगितलं आहे. 5 जुलैला त्यांनी एक पत्र पाठवलं आणि ते पत्र 30 जूनचे आहे असं सांगितलं आहे.अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे आव्हाड म्हटले आहे. शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहे, असे भाष्य केले आहे. नंतर अध्यक्ष बदलला अशी विरोधाभासाची भूमिका अजित पवार घेऊ शकत नाहीत, असेही जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *