Monday , December 8 2025
Breaking News

गृहिणींचे बजेट कोलमडणार! डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता

Spread the love

 

सर्व डाळींच्या उत्पादनांत यंदा मोठी घट

नवी दिल्ली : किराणा मालाच्या भावात मागील महिन्याभरापासून खूप वाढ होत चाललीये. अशातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याचं समोर आलंय. तसंच यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत नऊ टक्क्यांची घसरण आहे . तर गेल्यावर्षी पाच लाख टन डाळीची तूट होतीच त्यात येणाऱ्या वर्षांत ही तूट कायम असणार असल्याचंही बोललं जातंय.

मागील एक ते दीड महिन्यापासून सर्व प्रकारच्या किराणा मालाचे भाव तेजीत आहेत. त्यात सर्व प्रकारच्या डाळी, तांदूळ, गहू ज्वारी पोहे शेंगदाणे याचे भाव दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत वाढले आहेत. जसा नवीन माल बाजारात दाखल होईल तसे भाव पडतील अशी आशा आहे. मात्र यावर्षी सर्व प्रकारच्या डाळी त्यातल्या त्यात तूरडाळीचे भाव तेजीतच असतील अशी परस्थिती निर्माण झाली आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या देशातील पेरणीच्या आकडेवारीत डाळीच्या लागवडीचे क्षेत्र घटले असल्याची माहिती आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या डाळीच्या लागवडीचे क्षेत्र नऊ टक्के घटले आहे . याचा थेट परिणाम देशातील डाळीच्या एकूण उत्पादनाच्या चार लाख टनाची घट असणार आहे, गेल्यावर्षी देशात आवश्यक असणाऱ्या डाळीतील तूट ही पाच लाख टन होती. यावर्षी ही तूट भरून निघाली नाही, याचा थेट परिणाम भाववाढीवर होणार आहे

देशात डाळीची तूट निर्माण होण्यामागे बदललेले पाऊसमान हे मुख्य कारण आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागातील राष्ट्रीय खाद्य विषयांच्या माहितीनुसार पाच ऑगस्टपर्यंत देशात 106.88 लाख हेक्टरवर सर्व डाळीचे लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा कमी आहे . गेल्या वर्षी हा आकडा 117.87 लाख हेक्टर इतका होता. यानुसार पेरणी मध्ये 9.32% ची घट झाली आहे. दरवर्षी देशात 42 ते 44 लाख टन म्हणजे सर्वाधिक मागणी ही तूरडाळीची असते. मात्र मागील वर्षी पाच लाख टन मालाची घट होती आणि यावर्षी चार लाख टन मालाची घट अपेक्षित आहे. तूर डाळीच्या पेरणी क्षेत्रामध्ये 7.88 टक्के घट झाली आहे.

महाराष्ट्रात चांगल्या पावसामुळे 44 हजार हेक्टरवर अतिरिक्त पेरणी झाल्या आहेत. मात्र ही वाढ अत्यल्प आहे. डाळीवर प्रक्रिया झाल्यानंतर हाती पडणार उत्तम डाळ ही कमी उत्पादित होत असते. याचा थेट परिणाम भाव वाढीवर होतो.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *