Wednesday , March 4 2026
Breaking News

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Spread the love

 

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हा जामीन दोन महिन्यांसाठी असेल, असे स्पष्ट केले आहे. मलिक हे फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात होते.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांचा तात्पुरता वैद्यकीय जामीन अर्ज फेटाळला होता. त्या आदेशाविरुद्ध मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवारी (दि. 11) सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने मलिक यांना तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *