Monday , December 8 2025
Breaking News

चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर; लँडिंगचा शेवटचा टप्पा पार

Spread the love

 

श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, विक्रम लँडर आता त्याची उंची आणि वेग कमी करत आहे. चांद्रयान-3 ने रात्री उशिरा म्हणजेच रविवारी (20 ऑगस्ट) पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. आता विक्रम लॅंडर चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे.

23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार चांद्रयान-3

मिशन मूनचा आणखी एक टप्पा पार करताना आज पहाटे 1.50 वाजता विक्रम लँडरचे यशस्वीरित्या डी-बूस्टिंग करण्यात आले. म्हणजेच चांद्रयान-3 चा वेग कमी करण्यात यश आले आहे. इस्रोने या संदर्भात माहिती दिली आहे. तर, अंतिम डीबूस्टिंग ऑपरेशनने यशस्वीरित्या एलएम कक्षा 25 किमी x 134 किमी पर्यंत कमी केली आहे. मॉड्यूलला अंतर्गत तपासणी करावी लागेल आणि लँडिंग साईटवर सूर्योदयाची प्रतीक्षा करावी लागेल. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे 45 मिनिटांनी ते उतरणे अपेक्षित आहे.

सूर्योदयाची वाट का पाहावी लागणार?

या डीबूस्टिंगसह, विक्रम लँडर चंद्राच्या सर्वात खालच्या कक्षेत पोहोचला आहे. त्यानंतर आता त्याचे चंद्रापासून किमान अंतर फक्त 25 आणि कमाल अंतर 134 किलोमीटर आहे. चांद्रयान-3 आता फक्त चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्योदयाची वाट पाहत आहे. सध्या चंद्रावर रात्र असून 23 तारखेला सूर्योदय होईल. विक्रम लँडर सूर्यप्रकाश आणि शक्ती वापरून आपले ध्येय पुढे नेणार आहे. दोन्ही रोव्हर वीज निर्मितीसाठी सौर पॅनेल वापरतील.

लँडिंगसाठी ‘या’ आव्हानांवर मात करावी लागेल

चंद्राचा पृष्ठभाग असमान आणि खड्डे, दगडांनी भरलेला आहे. अशा पृष्ठभागावर उतरणे धोकादायक ठरू शकते. चंद्रावर उतरण्यापूर्वी शेवटच्या काही किलोमीटरमधील परिस्थिती सर्वात धोकादायक असते कारण त्यावेळी अवकाशयानाच्या जोरातून वायू बाहेर पडतो. या वायूंमुळे, चंद्राच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात धूळ उडते, ज्यामुळे ऑनबोर्ड संगणक आणि सेन्सर खराब होऊ शकतात किंवा गोंधळात टाकतात. त्यामुळे या आव्हानांचा सामना केल्यानंतरच सुरक्षित लॅंडिंग होईल.

विक्रम लँडरचे पाय अतिशय मजबूत करण्यात आले आहेत. विक्रमला मोठ्या खड्ड्यात उतरावे लागले तर त्याला कोणतीही अडचण येणार नाही. लँडरच्या बाहेर एक विशेष कॅमेरा बसवण्यात आला आहे. याला लेसर डॉपलर वेलोसिमीटर म्हणतात. या लेझरचा प्रकाश चंद्राला सतत स्पर्श करेल. इस्रोच्या नियंत्रण कक्षात बसलेल्या शास्त्रज्ञाचे त्यावर पूर्ण नियंत्रण असेल.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *