Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर झोन क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेचे घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथे दि. 10/8/2023 रोजी येथे संप्पन्न झाल्या. येळ्ळूर झोनल क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये मुलांचा खो -खो मध्ये प्रथम क्रमांक पटकविला तर हॉलिबॉलमध्ये द्वितीय. सांघिक स्पर्धेत रिलेमध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक पटकविला. खो -खो मध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक पटकवला आणि थ्रोबॉलमध्ये द्वितीय क्रमांक पटकवला.100 मी. मध्ये दिनेश बिजगरकर प्रथम, 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत आदिती बिजगरकर हीने तृतीय तर सुमित बसरीकट्टी प्रथम. 800 मी. मध्ये निलेश कणबरकर द्वितीय, आदित्य घाडी तृतीय. स्नेहा कुगजी 1500 मी. मध्ये प्रथम आणि मनश्री कुगजी तृतीय, समर्थ कणबरकर तृतीय, रेश्मा कुगजी हिने 3000 मी. मध्ये प्रथम तर जयश्री कुगजी तृतीय क्रमांक पटकाविला. उंच उडीमध्ये दिनेश बिजगरकर, स्नेहा लोहार तृतीय, निलेश कणबरकर तृतीय. थाळी फेकमध्ये आदिती गोरल तृतीय. तिहेरी उडी मध्ये रेश्मा कुगजी प्रथम, निलेश कणबरकर द्वितीय आणि समर्थ कणबरकर तृतीय. तर योगामध्ये कुशाली कदम प्रथम, करुणा मजुकर द्वितीय. तर कुस्तीमध्ये अक्षरा गुरव प्रथम, मानसी कुगजी द्वितीय क्रमांक पटकविला. साखळी गोळा मध्ये समर्थ बेडरे प्रथम, सुमित बसरीकट्टी द्वितीय. थाळी फेकमध्ये मानव धामणेकर प्रथम.
सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले, टी. एस. बोकडेकर, ए. बी. कांबळे, एल. एस. बांडगे, वाय. बी. कंग्राळकर, व्ही. पी. जीवाई तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विध्यार्थी पालक व गावाकऱ्यांच्या अभिनंदनास पात्र ठरले व पुढील तालुका लेवल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *