Wednesday , March 4 2026
Breaking News

जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर

Spread the love

 

केरळमध्ये मोठी दुर्घटना!

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. वायनाड जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या जीपला अपघात झाला अन् नऊ जणांनी आपला जीव गमावला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक महिला असल्याचे सांगितलं जात आहे. वायनाड पोलिसांनी सांगितलं की, केरळच्या वायनाड जिल्ह्यात एका जीपला झालेल्या अपघातात किमान नऊ जण ठार झाले आहेत.

मृतांमध्ये बहुतांश महिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास वल्लाड-मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. गाडीत १२ जण होते. वायनाड हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला.

एका स्थानिक रहिवाशाने मीडियाला सांगितले की, जीप एका खासगी चहाच्या बागेत काम करणाऱ्या महिलांना घेऊन मक्कीमालाला परतत होती. या अपघातात जखमी झालेल्यांना मानंथवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *