Tuesday , December 9 2025
Breaking News

तामिळनाडूत लखनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग, 10 प्रवाशांचा मृत्यू; तर 25 जण जखमी

Spread the love

 

चेन्नई : तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लखनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागली आहे. त्यानंतर काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर घेऊन रेल्वे डब्यात प्रवेश केला होत. या सिलेंडरमुळेचं ट्रेनला भीषण आग लागल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्यात भीषण आग दिसत आहे. त्याचवेळी आजूबाजूला काही लोक ओरडत आहेत. आग लागल्यानंतर मोठा आवाज देखील येत आहे. अग्निशामनक दलानं घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खासगी डब्यात आज पहाटे 5.15 वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागल्याची घटना घडलीय. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी धाकल झाले होते. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.

गेल्या काही दिवसातील हा दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही आग नेमकी कशामुळं लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लखनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्यामुळं नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आगीची भीषणता दृष्यांमधून आपल्याला दिसत आहे. दरम्यान, या आगीत 25 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसातील हा दुसरा सर्वात मोठा रेल्वेचा अपघात आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *