Wednesday , March 4 2026
Breaking News

तांदूळ निर्यातीवर निर्बंध! उकड्या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क

Spread the love

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उकड्या तांदळावर तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे. सरकारने उकड्या तांदळावर म्हणजेच पारबॉईल्ड तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बासमती तांदूळ आणि उकड्या तांदळाच्या निर्यातीवर नवी निर्बंध लागू केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तांदळाच्या निर्यातीला आळा बसणार आहे आणि याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. यामुळे देशातील तांदळाचा साठा वाढवण्यातही मदत होईल.

उकड्या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क
केंद्र सरकारने उकड्या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे. तांदळाचा देशांतर्गत पुरेसा साठा राखणे आणि तांदळाच्या देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 25 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेले हे निर्यात शुल्क 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू असेल.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *