
मडगाव : एकीकडे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाकरीता खास येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी फातोर्डा नगरी सज्ज होत असतांना (गुरुवार) रात्री उशीरा फास्टफुडच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून पिस्तुलाने गोळीबार करण्याची घटना फातोर्डा परीसरात घडली. व्यवसायिक वादातून तब्बल दोन वेळा मुसिफुल्ला खान याच्यावर गोळीबार करण्यात आला. पण सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी झाले नाही.
रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. ऐन राष्ट्रीय स्पर्धेच्या काळात ही घटना घडल्यामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या घटनेची दखल घेउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा भेटी दरम्यान असले प्रकार घडू नयेत यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
या विषयी सविस्तर माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्यांचे नाव रसेल डिसौजा असे आहे. त्याच्याकडील ती बंदुक परवाना धारक आहे. गोळीबार करून तो स्वतःच पोलिस स्थानकात हजर झाला. रसेल याच्या मालकीचे फातोर्डात एक फास्टफूड सेंटर असुन, मुसिफुल्ला खान याने त्याच्याकडुन ते महिनाभरापूर्वी चालवायला घेतले होते. पण त्याने फास्टफूडचे पैसे रसेल याला दिले नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता.
Belgaum Varta Belgaum Varta