Friday , December 27 2024
Breaking News

रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री, 7 डिसेंबरला होणार भव्य शपथविधी

Spread the love

 

हैदराबाद : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आलं असून ते 7 डिसेंबरला शपथ घेणार आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला, पण हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आणि मुख्यमंत्री नियुक्तीचा अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोडण्यात आला. या प्रकरणाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही पसंती रेवंत रेड्डी यांना असल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी रेवंत रेड्डी यांचे नाव अंतिम करण्यात आलं.

रेवंत रेड्डी यांचा विरोध

तेलंगणात काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार असलेले रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या विरोधानंतर सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा रद्द करावा लागल्याचीही चर्चा आहे.

रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समितीचे पी नरेंद्र रेड्डी यांचा 32,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू

Spread the love  जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *