Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Spread the love

 

नवी दिल्ली : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. या मुद्यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

18 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीस संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना निमंत्रन देण्यात आलं आहे. मात्र, या बैठकीला शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांच्यासारखे बडे खासदार उपस्थित राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दम्यान, सध्या संसदेचं गिवाळी अधिवशन सुरु आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व खासदार हे दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळं आता यामधील कोणकोणते खासदार संभाजीराजे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *