Tuesday , March 3 2026
Breaking News

“हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू”! एमव्ही केम प्लुटोवरील ड्रोन हल्ल्यावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले

Spread the love

 

नवी दिल्ली : ‘एमव्ही केम प्लुटो’ जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील ‘एमव्ही साईबाबा’वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे. यासंदर्भात बोलताना, संबंधित हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या सागरी क्षेत्रातील हालचाली वाढल्या आहेत. भारताची वाढती आर्थिक शक्ती काही लोकांना खटकू लागली आहे. केम प्लुटो आणि साई बाबा या दोन भारतीय जहाजांवर हल्ला करण्यात आला आहे. पण आम्ही सांगत आहोत की, ज्याने कुणी हे कृत्य केले असेल त्याला समुद्राच्या तळापासूनही बाहेर काढू आणि धडा शिकवू. त्याला उत्तर देऊ.

तसेच, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार म्हणाले, कमर्शिअल शिप्सवर समुद्री दरोडे आणि ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी चार विध्वंसक जहाजे तैनात करण्यात आली आहेत. यावर पी-8आय विमान, डोर्नियर्स, सी गार्डियन, हेलीकॉप्टर आणि तटरक्षक दलाच्या जहाजांचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *