
पटना : बिहारमधील खगारिया येथे ट्रॅक्टर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. चौथम ब्लॉक परिसरात एका लग्नातून परतत असताना कार ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
Belgaum Varta Belgaum Varta