Tuesday , December 9 2025
Breaking News

गुजरात एटीएसची मोठी कारवाई, आयएसआयएसच्या ४ दहशतवाद्यांना अटक

Spread the love

 

अहमदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी 2023 मध्ये एटीएसने राजकोटमधून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. ते तिन्ही दहशतवादी बांगलादेशी हँडलकरसाठी काम करत होते. दहशतवादी संघटनेसाठी लोकांची भरती करण्यात त्यांचा सहभाग होता. ते तिन्ही आरोपी तरुणांना कट्टरतावादी करत तयार करत होते.

मिळालेल्या दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचले. पाकिस्तानी हँडलरच्या आदेशानंतर त्यांनी काहीतरी कट आखला होता. त्यामुळे हे दहशतवादी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या उद्देशाने पोहोचले होते, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

चेन्नईमार्गे अहमदाबादमध्ये दाखल
गुजरात पोलिसांच्या मदतीने एटीएसने चार आरोपींना बेड्या ठोकल्या. गुजरात पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने श्रीलंकेतून दहशतवादी पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुजरात एटीएसने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. दहशतवाद्यांना टार्गेट लोकेशनवर पोहचण्याआधीच ताब्यात घेण्यात आलेय. अहमदाबाद विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना अटक केली.

एटीएसच्या हातात मोठा पुरवा
अटक करण्यात आलेले चारही पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात होते. त्यांनी मोठा कट आखला होता. हे दहशतवादी पाकिस्तानातील आदेशाची वाट पाहत होते, असेही समोर आले आहे. या दहशतवाद्यांना शस्त्रेही स्वतंत्रपणे पोहोचवली जाणार होती. एटीएसने या दहशतवाद्यांच्या फोनमधून एन्क्रिप्टेड चॅट जप्त केले आहेत. एटीएसकडून चारही दहशतव्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. चॅट्समधून बरीच माहिती उघड झाली आहे.

गुजरात पोलिस अलर्ट मोडवर
सुरत पोलिसांकडून मौलवी सोहेल अबुबकरच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यावेळीच गुजरातमध्ये चार ISIS दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पण हे दहशतवादी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. गुजरात पोलिसांकडून सर्व यंत्रणा अलर्टमोडवर ठेवण्यात आल्या आहेत. बारकाईने सर्व ठिकाणी लक्ष देण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *